INDIA MENS U19 IN ENGLAND ODI SERIES 2025 Youth List-A Match : भारताच्या युवा खेळाडूंनी आज इंग्लंडमध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. १९ वर्षांखालील संघही इंग्लंड दौऱ्यावर आहे आणि पहिल्या लिस्ट ए सामन्यात त्यांनी विजयाच्या दिशेने कूच केली आहे. इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्य्रू फ्लिंटॉफच्या मुलाने भारतीय गोलंदाजांना चांगला चोप दिला, परंतु वैभव सूर्यवंशीने इंग्लंडला जमिनीवर आणले. भारताने हा सामना ६ विकेट्स राखून जिंकला.