
इंग्लंड आणि भारत संघात लीड्समधील हेडिंग्ले येथे सुरू असलेला सामना रोमांचक वळणावर आहे. या सामन्यात शेवटच्या दिवशी तिन्ही निकाल शक्य आहेत. चौथ्या दिवशी भारताकडून केएल राहुल आणि रिषभ पंत यांनी केलेल्या दमदार शतकांमुळे इंग्लंडसमोर भारताला चौथ्या दिवशी ३७१ धावांचे मोठे लक्ष्य ठेवता आले आहे.
या लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या दिवस अखेर इंग्लंडनेही एकही विकेट गमावलेली नाही. त्यामुळे आता पाचव्या दिवशी दोन्ही संघ दबावात कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचेच लक्ष्य असणार आहे.