
इंग्लंड दौऱ्यातील पहिल्याच सामन्यात भारतीय फलंदाजी चमकली आहे. दोन्ही डावात भारतीय फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली. त्यामुळे हेडिंग्ले येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत भारताला इंग्लंडसमोर चौथ्या डावात ३७१ धावांचे मोठे लक्ष्य ठेवता आले आहे. यामध्ये केएल राहुल आणि रिषभ पंत यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. या दोघांनीही दुसर्या डावात शतके केली. त्यामुळे या सामन्यात ७० वर्षांनंतर एक खास योगायोगही पाहायला मिळाला आहे.
या सामन्यात चौथ्या दिवशी (२३ जून) भारताने दुसऱ्या डावात २३.५ षटकापासून आणि २ बाद ९० धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. त्यावेळी कर्णधार शुभमन गिल ६ धावांवर आणि केएल राहुल ४७ धावांवर नाबाद होते. त्यांनी चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला पण चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच २५ व्या षटकात बाद झाला. त्याला ब्रायडन कार्सने त्रिफळाचीत केले.