
इंग्लंड विरुद्ध भारत संघात कसोटी मालिकेतील पहिला सामना हेडिंग्ले येथे शुक्रवारपासून (२० जून) सुरू झाला आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजी पहिल्या डावात चमकली आहे. विशेषत: पहिला डाव यशस्वी जैस्वाल, कर्णधार शुभमन गिल आणि यष्टीरक्षक रिषभ पंतने गाजवला.
या सामन्यापासून भारत आणि इंग्लंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ स्पर्धेला सुरुवात केली. याशिवाय याच सामन्यातून शुभमन गिलच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळालाही सुरूवात झाली असून गिलने सुरुवात दणक्यात केली आहे.
अनेक वर्षांनंतर रोहित शर्मा, विराट कोहली, आर अश्विन या दिग्गजांशिवाय मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने पहिल्याच डावात साडेचारशे धावा पार केल्या आहेत.