
इंग्लंड विरुद्ध भारत संघात शुक्रवारी हेडिंग्लेमध्ये कसोटी मालिकेला सुरूवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय फलंदाजांनी पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारली. या सामन्यात एका खेळाडूकडे सर्वांचे लक्ष होते, तो खेळाडू म्हणजे करूण नायर.
भारताचा कसोटीतील त्रिशतकवीर असलेल्या करूण नायरने यापूर्वी २०१७ मध्ये अखेरचे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर त्याला भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नव्हती. पण त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची प्रतिभा दाखवली होती आणि तब्बल ८ वर्षांनी भारताकडून पुनरागमनाची संधी मिळवली.