
लीड्समधील हेडिंग्ले येथे होत असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंड क्रिकेट संघाने पहिल्या डावात भारतीय संघाला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ऑली पोप आणि हॅरी ब्रुकच्या शानदार खेळानंतर इंग्लंडच्या तळातल्या फलंदाजांनीही भारतीय गोलंदाजांना सतावलं होतं. पण तरी जसप्रीत बुमराहने घेतलेल्या ५ विकेट्सच्या जोरानर भारताने पहिल्या डावात ६ धावांची आघाडी घेतली.
या सामन्यात भारताचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी ४७१ धावांवर संपुष्टात आला होता. त्यानंतर इंग्लंडचा संघ पहिल्या डावातील फलंदाजीसाठी उतरला. इंग्लंडकडून झॅक क्रावली आणि बेन डकेट यांनी डावाची सुरुवात केली. पण जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात क्रावलीला ४ धावांवर करूण नायरच्या हातून झेलबाद केले.