
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत नेहमीच स्टंपमागे उभा असताना इतर संघसहकाऱ्यांशी मजेशीर संवाद साधताना दिसतो. अनेकदा त्याचा संवाद स्टम्पमाईकमध्ये कैद होतो. सध्या पंत भारत आणि इंग्लंड संघात हेडिंग्लेला सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत खेळताना दिसत आहे.
त्याने या सामन्यात फलंदाजी करताना पहिल्या डावात शानदार शतकही केले. या सामन्यातही पंत काही ना काही बोलताना दिसला आहे. त्याचे काही स्टम्प माईकमधील संवादही व्हायरल झाले आहेत.