
इंग्लंड विरुद्ध भारत संघात कसोटी मालिकेला शुक्रवारपासून (२० जून) सुरूवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना लीड्समधील हेडिंग्ले येथे सुरू झाला असून पहिला दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला. विशेषत: शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल या दोन खेळाडूंनी. भारताने पहिल्याच दिवशी साडेतीनशे धावांचा टप्पा पार केला आहे.
अनेक वर्षांनंतर विराट कोहली, रोहित शर्मा आणि आर अश्विन या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघ कसोटीत खेळत आहे. त्यामुळे युवा भारतीय संघ या सामन्यात कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.