
इंग्लंड विरुद्ध भारत संघातील तेंडुलकर - अँडरसन ट्रॉफी या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला शुक्रवारपासून (२० जून) सुरूवात झाली आहे. पहिला सामना लीड्सच्या हेडिंग्ले मैदानात खेळला जात आहे.
या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताकडून केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी दमदार सुरुवात केली. मात्र या सामन्यातून पदार्पण करणाऱ्या साई सुदर्शनच्या नावावर मात्र नकोसा विक्रम झाला आहे.