
इंग्लंड विरुद्ध भारत संघात हेडिंग्लेमध्ये होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसाचा (२२ जून) खेळ शेवटच्या सत्रात आलेल्या पावसाच्या व्यत्ययानंतर थांबवण्यात आला.
तिसऱ्या दिवसअखेर भारतीय संघ वरचढ दिसत असून भारताकडे ९६ धावांची आघाडी आहे. केएल राहुल अर्धशतकाकडे वाटचाल करत असून तो आता चौथ्या दिवशी मोठी खेळी करणार का, याकडे सर्वांचे लक्ष असेल.