
भारत आणि इंग्लंड संघात शुक्रवारी (२० जून) हेडिंग्लेवर सुरू झालेला सामना रोमांचक होत आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी उभारलेल्या मोठ्या धावसंख्येला इंग्लंडकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. दरम्यान, या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात भारतीय खेळाडू अंपायरवर नाराज असल्याचे स्पष्ट दिसले.