
भारत आणि इंग्लंड संघ सध्या अँडरसन - तेंडुलकर ट्रॉफी २०२५ या कसोटी मालिकेत व्यग्र आहेत. पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना प्रतिष्ठीत लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर आजपासून (१० जुलै) खेळवला जात आहे. ही मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत असल्याने तिसरा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकणारा संघ मालिकेत आघाडी घेईल.