
भारत विरुद्ध इंग्लंड संघात होत असलेली अँडरसन - तेंडुलकर ट्रॉफी ही कसोटी मालिका रोमहर्षक होत आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळाली. पहिल्या सामन्यात इंग्लंडने ५ विकेट्सने बाजी मारली, तर भारताने दुसऱ्या सामन्यात पलटवार करताना ३३६ धावांनी मोठा विजय मिळवला.
त्यामुळे ५ सामन्यांच्या या कसोटी मालिकेत सध्या १-१ अशी बरोबरी आहे. अशात या मालिकेतील तिसरा सामना चुरशीचा होण्याची अपेक्षा सर्वांना आहे.
तिसरा कसोटी सामना लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर गुरुवारपासून (१० जुलै) सुरू होत असून भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे.