
शुभमन गिलच्या नेतृत्वातील भारतीय क्रिकेट संघाने रविवारी (६ जुलै) ऍजबॅस्टनवर इतिहास रचला. यजमान इंग्लंड संघाला कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात तब्बल ३३६ धावांनी पराभवाचा धक्का दिला आणि मालिकेतही १-१ अशी बरोबरी साधली आहे. \
भारताचा ऍजबॅस्टनवरील हा कसोटी इतिहासातील पहिलाच विजय ठरला. याशिवाय परदेशातील हा भारताचा धावांच्या तुलनेतीलही सर्वात मोठा विजय ठरला. या मालिकेतील पहिला सामना पराभूत झाल्यानंतर भारताने दुसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन केले आणि विजेतेपदाला गवसणी घातली. त्यामुळे भारतीय संघाचे सध्या कौतुक होत आहे.
या सामन्यावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली हे देखील लक्ष ठेवून होते. त्यांनीही सामन्यानंतर शुभमन गिल आणि भारतीय संघाचे कौतुक केले आहे.