
इंग्लंड आणि भारत संघात शुक्रवारी (२० जून) हेडिंग्लेमध्ये सुरू झालेल्या पहिल्या कसोटीत रोमांचक खेळ पाहायला मिळत आहे. दोन्ही संघ तोडीस तोड खेळ करताना दिसत आहेत.
पहिल्या दिवसावर भारताचे वर्चस्व राहिले होते, त्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र इंग्लंडचे वर्चस्व दिसून आले. तरी दुसऱ्या दिवस अखेरीस इंग्लंड अद्याप २६२ धावांनी पिछाडीवर आहे. पण हा दिवस इंग्लंडसाठी ऑली पोपने गाजवला. त्याने शतकी खेळी केली.