ENG VS PAK 1ST TEST: तुला पाच, मला पाच! इंग्लंडच्या गोलंदाजांचा कहर, पाकिस्तानचे बारा वाजवले; पहिल्याच दिवशी जागेवर आपटले...

Pakistan batting collapse against England first Test: इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजीची अक्षरशः दाणादाण उडवली. पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानचा डाव गुंडाळण्यात इंग्लंडला यश आले.
ENG vs PAK 1st Test

Josh Tongue Ollie Robinson five wickets

esakal

Updated on

ENG vs PAK 1st Test Josh Tongue Ollie Robinson five wickets: ऑली रॉबिन्सनने पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानच्या सलामीवीराला माघारी पाठवून इतिहास रचला अन् त्यानंतर इंग्लंडच्या इतर गोलंदाजांनी कहर केला. बाबर आझमच्या अनुपस्थितीत सलमान आघाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तानचा पहिला डाव अवघ्या ४८.१ षटकांत गडगडला. रॉबिन्सन व जॉश टंग यांनी प्रत्येकी पाच विकेट्स घेऊन पाकिस्तानचा पहिला डावा १७१ धावांवर गुंडाळला. प्रत्युत्तरात दिवसअखेर इंग्लंडने २ बाद ११२ धावा केल्या. इंग्लंडचा संघ अजूनही ५९ धावांनी पिछाडीवर असला तरी त्यांना मोठी आघाडी घेण्याची चांगली संधी आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com