ENG vs PAK 1st Test: अरे काय हे! ०.१ चेंडूवर पाकिस्तानची विकेट, कपिल देव यांनी ४३ वर्षांपूर्वी दिलेला असा धक्का, आता... Video Viral

Ollie Robinson dismisses Pakistan batter on first ball of Test: इंग्लंड-पाकिस्तान यांच्यातल्या पहिल्या कसोटीला आजपासून सुरूवात झाली आणि पहिल्याच चेंडूवर पाकड्यांची झोप उडवली.
ENG vs PAK 1st Test

ENG vs PAK 1st Test Ollie Robinson first ball wicket

esakal

Updated on

ENG vs PAK 1st Test Ollie Robinson first ball wicket: इंग्लंड-पाकिस्तान यांच्यातल्या पहिल्या कसोटीसामन्याला आजपासून सुरू झाली. इंग्लंडने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीला बोलावले. कर्णधार बाबर आझम याला दुखापतीमुळे आजच्या सामन्याला मुकावे लागले आहे आणि त्याच्या अनुपस्थितीत सलमान आघाकडे पुन्हा नेतृत्व सोपवण्यात आले. पण, पाकिस्तानला पहिल्याच चेंडूवर धक्का देत ऑली रॉबिन्सनने इतिहास घडवला. ४३ वर्षांनंतर पाकिस्तानसोबत अशी लाजीरवाणी घटना घडली. १९८३ मध्ये कपिल देव यांनी सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानला धक्का दिला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com