इंग्लंडचा अष्टपैलू जेमी ओव्हर्टनने रेड-बॉल क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला.
त्याने आजवर ९९ फर्स्ट-क्लास सामने आणि २ कसोटी सामने खेळले आहेत.
ओव्हर्टनने कसोटी पदार्पण २३ जून २०२२ रोजी केले आणि शेवटचा सामना भारताविरुद्ध ३१ ऑगस्ट २०२५ रोजी खेळला.
Jamie Overton England all-rounder Test career updates : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू जेमी ओव्हर्टन याने अनिश्चित काळासाठी रेड बॉल क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. ९९ प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या ओव्हर्टनने सोमरसेट व सरे या क्लबचे प्रतिनिधित्व केले आहे आणि इंग्लंड संघाकडून दोन कसोटी सामने खेळले आहेत. २३ जून २०२२ मध्ये त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि त्यानंतर दुसरा सामना तो ३१ ऑगस्ट २०२५ मध्ये भारताविरुद्ध खेळला. त्याच्या ब्रेकच्या निर्णयाचे सर्वांना आश्चर्य वाटत आहे.