England Squad vs Pakistan : पाकड्यांचा बँड वाजवण्यासाठी इंग्लंडने जाहीर केला तगडा संघ! २ वर्षानंतर एका खास ऑल राऊंडरला बोलावले... बाबरच्या संघाचे धाबे दणाणले

England squad for Pakistan Test series 2026: पाकिस्तानविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडने पहिल्या दोन सामन्यांसाठी १६ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. बेन स्टोक्सच्या आंतरराष्ट्रीय निवृत्तीनंतर रिक्त झालेल्या ऑलराऊंडरच्या भूमिकेत एक महत्त्वाचा खेळाडू परतला आहे.
England squad for Pakistan Test series 2026

England squad for Pakistan Test series 2026

esakal

Updated on

England announce 16-man squad for Pakistan Tests: वेस्ट इंडिज दौऱ्यावर पाकिस्तानने कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली असली तरी त्यांची खरी कसोटी आता इंग्लंड दौऱ्यावर लागणार आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील हा संघ तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडमध्ये दाखल होणार आहे. या मालिकेसाठी यजमान इंग्लंडने गुरुवारी १६ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. जॉर्डन कॉक्स ( Jordan Cox) हा जेकब बेथेलच्या अनुपस्थितीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. बेथेलला गुडघ्याच्या दुखापतीमुळे मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com