
India vs England 1st ODI: इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून उद्यापासून (६ फेब्रुवारी) यजमानांविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. भारत आणि इंग्लंड संघात होणाऱ्या वनडे मालिकेतील पहिला सामना नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या आधी ही मालिका होत असल्याने दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. दरम्यान, नागपूरला होणाऱ्या पहिल्या वनडेपूर्वीच इंग्लंड संघाने त्यांची प्लेइंग इलेव्हन घोषित केली आहे.