
India vs England Virat Kohli Massive Record: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ट्वेंटी-२० मालिकेत इंग्लंडला ४-१ असा शह दिल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघ वन डे मालिका गाजवण्यास सज्ज झाला आहे. तीन वन डे सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून सुरूवात होतेय. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची पूर्वतयारी म्हणून या मालिकेकडे पाहिले जात आहे आणि रोहित व विराट कोहली या सीनियर खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असणार आहे. या मालिकेत विराटला वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवण्याची संधी आहे. जगात आतापर्यंत एकाही फलंदाजाला इंग्लंडविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये असा विक्रम नोंदवता आलेला नाही.