

Rohit Sharma - Virat Kohli | India vs England Lord's ODI
Sakal
England vs India, 3rd ODI: इंग्लंडने रविवारी (१९ जुलै) भारताविरुद्ध लॉर्ड्सवर झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात २७ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत इंग्लंडने २-१ अशा फरकाने विजय मिळवला आहे.
या पराभवानंतर भारताचा इंग्लंड दौराही संपला. या दौऱ्यात भारताला एकमेव विजय कार्डिफमध्ये झालेल्या दुसऱ्या वनडेत मिळाला. दरम्यान, रविवारी तिसऱ्या वनडेत रोहित शर्माने (Rohit Sharma) दमदार शतक केले, तर विराट कोहली (Virat Kohli) आणि कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) यांनीही शानदार अर्धशतकी खेळी केली, मात्र त्यांच्या खेळी व्यर्थ ठरल्या.
रविवारी झालेल्या वनडे सामन्यात इंग्लंडने लॉर्ड्सवरील सर्वोत्त धावसंख्या उभारताना भारतासमोर ३८८ धावांचे ऐतिहासिक लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला ५० षटकात ७ बाद ३६० धावाच करता आल्या.