
Curran Cricket Family: सॅम करन आणि टॉम करन ही नावं क्रिकेटप्रेमींसाठी नवीन नाही. इंग्लंड क्रिकेट संघाकडून खेळणारे हे दोन सख्खे भाऊ. इंग्लंडकडून या दोघांचेही आंतरराष्ट्रीय पदार्पण झाले आहे. या दोघांनीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छापही सोडली आहे, त्यातही सॅमला चांगले यश मिळाले आहे.
पण आता त्यांच्या तिसरा सख्ख्या भावाचेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झाले आहे. पण इंग्लंडसाठी नाही, तर त्यांच्या वडिंलांप्रमाणेच झिम्बाब्वेकडून. त्यांची कहाणी आहे तरी काय हे थोडक्यात जाणून घेऊ.