
Australia vs India Test Series: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात कसोटी मालिकेतील तिसरा सामना ब्रिस्बेनमधील द गॅबा मैदानात झाला. पण या सामन्याच्या पाचव्या दिवशीही पावसाचा व्यत्यय आला आणि अखेर सामना अनिर्णित राखण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, हा सामना अनिर्णित राहिल्यानंतर लगेचच एक मोठी अपडेट समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेडला दुखापत (groin injury) झाली असल्याची चर्चा होती.