
भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यापूर्वी इंग्लंड संघ झिम्बाब्वेविरुद्ध गुरुवारपासून (२२ मे) चार दिवसीय कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडची पकड मजबूत झाली आहे. या सामन्याचा दुसरा दिवस संपला, तेव्हा इंग्लंड २७० धावांनी आघाडीवर होते.
नॉटिंगघम येथे होत असलेल्या या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी इंग्लंडने ८९ व्या षटकापासून ३ बाद ४९८ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. पण दीडशतक केलेला ऑली पोप सुरूवातीलाच बाद झाला. त्याने १६६ चेंडूत २४ चौकार आणि २ षटकारांसह १७१ धावांची खेळी केली.