England Squad vs India T20I: भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी २२ वर्षीय ऑलराऊंडरला संधी

England Announce Squad for India T20I Series: भारताविरुद्ध १ जुलैपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी इंग्लंडने १७ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात सर्वात मोठे आकर्षण ठरला तो ससेक्सचा २२ वर्षीय अष्टपैलू खेळाडू James Coles.
England squad for India T20I series 2026

England squad for India T20I series 2026

esakal

Updated on

England squad for India T20I series 2026 : हॅरी ब्रूकच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ भारताविरुद्धच्या पाच ट्वेंटी-२० ( ENG vs IND ) सामन्यांच्या मालिकेत मैदानावर उतरणार आहे. हॅरी ब्रूक इंग्लंडच्या कसोटी संघाचा सदस्य आहे आणि तिसरी कसोटी संपल्यानंतर अवघ्या ४८ तासांत तो ट्वेंटी-२० मालिका खेळायला उतरेल. त्यासाठी त्याला नॉटिंगहॅम ते चेस्टर-ले-स्ट्रीट असा १५० माईल्सचा प्रवास करावा लागणार आहे. वर्ल्ड कप विजेत्या भारताला टक्कर देण्यासाठी जाहीर केलेल्या १७ वर्षीय संघात २२ वर्षीय जेम्स कोलेस ( James Coles) याची चर्चा आहे. भारतीय संघाकडूनही वैभव सूर्यवंशी ( Vaibhav Sooryavanshi) पदार्पण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन युवा खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com