
भारतीय क्रिकेट संघ जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका २० जून पासून भारत आणि इंग्लंड संघात खेळवली जाणार आहे. पण त्याआधी भारतीय अ संघ इंग्लंड दौऱ्यावर पोहचणार आहे.
भारतीय अ संघ इंग्लंड अ संघाविरुद्ध दोन चारदिवसीय सामने खेळणार आहे. त्यासाठी भारतीय अ संघाची घोषणा काही दिवसांपूर्वीच झाली आहे. अभिमन्यू ईश्वरन भारतीय अ संघाचा कर्णधार आहे. आता इंग्लंड अ संघाचीही (England lions) घोषणा बुधवारी (२१ मे) करण्यात आली आहे.