भारत-इंग्लंड पाचवी कसोटी ३१ जुलैपासून 'दी ओव्हल', लंडन येथे खेळवली जाणार
इंग्लंड २-१ ने आघाडीवर आहे, तर चौथी कसोटी अनिर्णित राहिली होती.
रिषभ पंत दुखापतीमुळे बाहेर गेला असून, जसप्रीत बुमराहही अंतिम कसोटीत खेळणार की नाही हे स्पष्ट नाही.
Jamie Overton returns to England squad for 5th Test vs India : अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ साठीचा पाचवा कसोटी सामना ३१ जुलैपासून दी ओव्हल येथे खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडने या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे आणि चौथी कसोटीत अनिर्णित राखून टीम इंडियाने आव्हान अजूनही कायम ठेवले आहे. पण, इंग्लंडचा संघ हार मानणारा नाही आणि त्यांनी पाचव्या कसोटीसाठी 'त्याला' पुन्हा बोलावले आहे. इंग्लंडने पाचव्या कसोटीसाठी त्यांचा संघ जाहीर केला आहे.