
भारताचे सध्या पुरुष, महिला आणि अंडर १९ संघ इंग्लंड दौऱ्यावर असून वेगवेगळ्या ठिकाणी सामने खेळत आहेत. शनिवारी (२८ जून) भारताच्या महिला संघाने इंग्लंडला टी२० मालिकेच्या पहिल्याच सामन्यात ९७ धावांनी पराभवाचा धक्का दिला. यासह टी२० मालिकेत १-० अशी आघाडीही घेतली. या सामन्यानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही इंग्लंडच्या महिला संघावर कारवाई केली आहे.