
भारतीय महिला क्रिकेट संघ देखील सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून टी२० मालिका खेळत आहे. पहिल्याच टी२० सामन्यात भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने इंग्लंडला इंगा दाखवला आहे.
शनिवारी (२८ जून) भारत आणि इंग्लंड महिला संघात नॉटिंगघमला पहिला टी२० सामना खेळवला जात आहे. या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या अनुपस्थितीत स्मृती मानधना भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. तिने कर्णधारपदाला साजेल असं शतकही या सामन्यात ठोकलं आहे.
इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. पण भारताकडून शफाली वर्मा आणि स्मृती मानधनाने शानदार सुरुवात केली. एकीकडे शफाली संयमी खेळ करत असताना मानधनाने आक्रमक खेळ केला. त्यांनी ७७ धावांची भागीदारी केली. यात शफालीने २० धावांचे योगदान दिले. स्मृतीने अर्धशतक पूर्ण केले.