

England ODI Team
Sakal
England vs India 1st ODI: भारत आणि इंग्लंड संघात काही दिवसांपूर्वीच टी२० मालिका झाली. या मालिकेत यजमान इंग्लंडने भारतीय संघाला ४-० अशा फरकाने पराभूत केले आहे. यानंतर आता वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला वनडे सामना बर्मिंगहॅम, एजबस्टन येथे मंगळवारी (१३ जुलै) खेळवला जाणार आहे.
आता इंग्लंड संघ टी२० मालिकेप्रमाणेच वनडे मालिकेतही वर्चस्व राखण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे, पण भारताचा वनडे संघ बराच वेगळा असल्याने त्यांच्यासमोर वेगळे आव्हान असेल, हे देखील निश्चित आहे.