इंग्लंडला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला आणि त्याचा परिणाम ICC ODI क्रमवारीत दिसला.
इंग्लंडचा संघ ताज्या क्रमवारीत आठव्या स्थानावर घसरला आहे.
भारत १२४ रेटिंगसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे, न्यूझीलंड दुसरा आणि ऑस्ट्रेलिया तिसरा.
India No.1 in ICC ODI team standings : इंग्लंडला काल वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला आणि आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वन डे क्रमवारी जाहीर केली. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत इंग्लंडचा संघ आठव्या क्रमांकावर आहे, तर दक्षिण आफ्रिका सहाव्या स्थानावर आहे. २०१९ च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाची क्रमवारी पाहून भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफर याने इंग्लंडची टर उडवली. त्याने पुन्हा एकदा इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याला टॅग करून डिवचले.