
England squads announced for India tour and ICC Champions Trophy: इंग्लंड क्रिकेट संघ नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच भारत दौरा कणार आहे. या दौऱ्यात इंग्लंड आणि भारत संघात ५ टी२० आणि ३ वनडे सामने खेळवले जाणार आहे. या मालिकांनंतर लगेचच दोन्ही संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळताना दिसतील.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ फेब्रुवारी-मार्च दरम्यान होणार आहे. या सर्व सामन्यांसाठी इंग्लंड संघांची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंडच्या वनडे आणि टी२० अशा दोन्ही संघात प्रत्येकी १५ खेळाडू आहेत. तसेच ब्रेंडन मॅक्युलम याचा इंग्लंडचा वनडे आणि टी२० प्रशिक्षक म्हणून भारत दौरा पहिलाच असेल.