ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

इंग्लंड संघाने बर्मिंगहॅम कसोटी सामना जिंकून पाकिस्तानला मालिकेत व्हाईटवॉश दिला आहे. इंग्लंडच्या या विजयाचा परिणाम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पाँइंट्स टेबलवरही झाला आहे.
Pakistan vs England

England Cricket Team

Sakal

Updated on

इंग्लंड क्रिकेट संघाने पाकिस्तानला तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्हाईटवॉश देण्यात यश मिळवलं आहे. बर्मिंगहॅम येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने ८ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आणि मालिका ३-० अशी जिंकली.

या मालिकेत इंग्लंडने निर्विवाद वर्चस्व राखल्याने त्याचा परिणाम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ च्या पाँइंट्स टेबलवरही (WTC 2025-27 Points Table) झाला आहे. या विजयाचा इंग्लंडला फायदा झाला आहे, तर पाकिस्तानला मोठे नुकसान झाले आहे.

Pakistan vs England
ENG vs PAK, Test: ७ खेळाडूंची हकालपट्टी तरी पाकिस्तानचा इंग्लंडने उडवला फज्जा! बाबर आझमही फ्लॉप, १३३ धावांत गुंडाळला संघ
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com