MITCHELL MARSH: मिचेल मार्शने मैदान गाजवलं, ११९ धावा ठोकूनही ऑस्ट्रेलियाची हार! शेवटच्या षटकात इंग्लंडच्या गोलंदाजाने असा फिरवला सामना

MITCHELL MARSH CENTURY: मिचेल मार्शने ११९ धावांची खेळी करूनही ऑस्ट्रेलियाला इंग्लंडविरुद्ध विजय मिळवता आला नाही. चौथ्या टी-२० सामन्यात इंग्लंडने ७ धावांनी विजय मिळवत पाच सामन्यांची मालिका ३-१ अशी जिंकली. अखेरच्या षटकात नेमकं काय घडलं?
MITCHELL MARSH

MITCHELL MARSH

esakal

Updated on: 

MITCHELL MARSH CENTURY: इंग्लंडने चौथ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ७ धावांनी पराभव केला. रविवारी झालेल्या या रोमांचक सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत सॅम करनच्या अर्धशतकाच्या जोरावर २० षटकांत ७ बाद १८१ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला मिचेल मार्शने शतक झळकावूनही विजय मिळवता आला नाही.

Loading content, please wait...