
भारतीय क्रिकेट संघ शुभमन गिलच्या नेतृत्वात इंग्लंडला ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी पोहचला आहे. या मालिकेला आजपासून (२० जून) सुरुवात होत आहे. पहिला सामना लीड्समधील हेडिंग्ले येथे खेळवला जात आहे.
ही मालिका वेगवेगळ्या कारणांसाठी महत्त्वाची आहे. भारतीय कसोटी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी या मालिकेपासून शुभमन गिल सांभाळणार आहे. याशिवाय अनेक वर्षांनंतर भारतीय संघ विराट कोहली, रोहित शर्मा आणि आर अश्विन या तीन अनुभवी खेळाडूंशिवाय खेळताना दिसणार आहे.