
भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटीत विजय मिळवण्याच्या जवळ आहे. सध्या बर्मिंगहॅममधील एजबस्टन येथे भारत आणि इंग्लंड संघ कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आमने-सामने आहेत.
या सामन्याच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी ५३६ धावांची गरज आहे, तर भारताला ७ विकेट्सची गरज आहे. त्यामुळे भारतीय संघ झटपट या विकेट्स घेऊन मालिकेत बरोबरी करण्यासाठी उत्सुक आहे.