
भारत आणि इंग्लंड संघात सध्या अँडरसन - तेंडुलकर ट्रॉफी २०२५ ही कसोटी मालिका सुरू असून दुसरा सामना आजपासून (२ जुलै) खेळवला जात आहे. बर्मिंगहॅममधील एजबस्टन येथे हा सामना होत आहे. या सामन्याआधी दोन्ही संघांना साधारण ८ दिवसांचा कालावधी तयारीसाठी मिळाला आहे. त्यामुळे दोन्ही संघ आता दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज आहेत.