
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका इंग्लंडमध्ये सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसलाय. यानंतर दुसऱ्या सामन्यात पुनरागमनासाठी टीम इंडिया सज्ज झालीय. बुधवारपासून बर्मिंगहॅममध्ये हा सामना होणार आहे. दरम्यान, भारतीय संघासोबत धक्कादायक असा प्रकार घडला आहे. सामन्याआधी भारतीय संघाला हॉटेलमध्येच बंद केल्याचं प्रकार उघड झालाय.