England win fourth Ashes Test on day two vs Australia
esakal
England vs Australia historic Test match WTC cycle : अॅशेस मालिकेत सलग तीन पराभवानंतर अखेर इंग्लंडला विजयाची चव चाखता आली. मेलबर्नवर गोलंदाज दादागिरी गाजवत असलेल्या खेळपट्टीवर इंग्लंडने दुसऱ्या दिवशी चौथी कसोटी जिंकली आणि मालिकेतील पिछाडी १-३ अशी कमी केली. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२७ या पर्वातला ऑस्ट्रेलियाचा हा सात सामन्यांतील पहिलाच पराभव ठरला. इंग्लंडने ४ विकेट्स राखून ऑस्ट्रेलियाची अपराजित मालिका खंडित केली. इंग्लंडने १४ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात कसोटी विजय मिळवला.