
अँडरसन - तेंडुलकर ट्रॉफी २०२५ या भारत - इंग्लंड संघात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील सलग तिसऱ्या कसोटी सामन्याचा निकाल पाचव्या दिवशी लागला आहे. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर झालेला तिसरा कसोटी सामना बेन स्टोक्सच्या नेतृत्वातील इंग्लंड क्रिकेट संघाने पाचव्या दिवशी धावांनी जिंकला. त्यामुळे ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत सध्या यजमान इंग्लंड संघाने २-१ अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता उर्वरित दोनपैकी एक जरी सामना जिंकला, तरी इंग्लंड मालिकेतील विजय निश्चित करेल.
दरम्यान, इंग्लंडने हा सामना जिंकल्याने त्यांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५-२७ स्पर्धेच्या पाँइंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलियापाठोपाठ दुसरा क्रमांक मिळवला आहे. मात्र भारताची टक्केवारी घसरली आहे. भारत चौथ्या क्रमांकावर आहे.