
भारताचा नवा कसोटी कर्णधार शुभमन गिलची बॅट इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी या कसोटी मालिकेतील पहिल्या दौन सामन्यात चांगलीच तळपली. मात्र, लॉर्ड्सवर होत असलेल्या तिसर्या कसोटीत त्याला फलंदाजीत फार काही खास करता आलेलं नाही. पण असं असलं तरी त्याने राहुल द्रविड आणि विराट कोहलीचा एक मोठा विक्रम मोडला आहे.