Ben Mayes become the second-highest run-scorer in Under-19 World Cup
esakal
U19 World Cup ENG vs SCOT Marathi Cricket News: १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडच्या बेन मायेसने ( Ben Mayes) विश्वविक्रमी कामगिरी करून दाखवली. भारतीय चाहत्यांना वैभव सूर्यवंशीकडून अशा पराक्रमाची प्रतीक्षा असताना इंग्लंडच्या मधल्या फळीतील फलंदाजाने स्कॉटलंडविरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम त्याने नावावर केला. मायेसचे द्विशतक थोडक्यात हुकले असले तरी त्याने आज मोठी खेळी करून भारताच्या वैभव सूर्यवंशीचा ( Vaibhav Suryavanshi) विक्रम मोडला.