
भारतीय क्रिकेट संघाने रविवारी (६ जुलै) इंग्लंडविरुद्ध ऍजबॅस्टनला झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ३३६ धावांनी मोठा विजय मिळवला. त्यामुळे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली. भारताच्या या विजयात कर्णधार शुभमन गिलसोबतच वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांचा मोठा वाटा राहिला.