Danish Kaneria accuses Pakistan of sheltering terrorists
जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाममधील ( Pahalgam Attack ) बायसरण मेडो येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात किमान २८ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आणि २० हून अधिक जण जखमी झाले. या हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेध केला जात आहे. भारत सरकारनेही कठोर पावलं उचलताना दहशतवाद्यांना जशासतसे उत्तर देण्याची तयारी केली आहे. २०१९ च्या पुलवामा बॉम्बस्फोटानंतरचा हा सर्वात भयंकर हल्ला मानला जात आहे. हा हल्ला द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) या लष्कर-ए-तयबाच्या समर्थक गटाने केल्याचा दावा केला जातोय. असे असताना पाकिस्तान सरकारकडून या हल्ल्याचा निषेध करणारी प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.