From Ranji to MLC: Agni Chopra’s Bold Move to Join MI New York
अमेरिकेत सुरू असलेल्या मेजर लीग क्रिकेटमध्ये मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचा एमआय न्यू यॉर्क संघ खेळतोय आणि आज त्यांना पहिल्याच लढतीत टेक्सास सुपर किंग्सकडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यात न्यू यॉर्क संघाकडून सलामीवीर अग्नी चोप्रा ( ५) याने पदार्पण केले. मागच्या पर्वात तो रणजी करंडक स्पर्धेत मिझोराम संघाकडून खेळला होता आणि त्या पर्वात प्लेट विभागात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाचा पुरस्कारही त्याने BCCI कडून घेतला होता. असे असूनही तो अमेरिकेतल्या लीगमध्ये खेळण्यासाठी कसा पात्र ठरला, हा प्रश्न सर्वांना पडला आहे.