PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

How Pakistan can qualify for T20 World Cup semi-final? इंग्लंडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर ८ मध्ये न्यूझीलंडवर ४ विकेट्स राखून विजय मिळवला आणि पाकिस्तानच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पण, त्यासाठी त्यांना बरंच कठीण गणित सोडवावं लागणार आहे.
Pakistan semifinal qualification scenario after NZ loss

Pakistan semifinal qualification scenario after NZ loss

esakal

Updated on

Pakistan semifinal qualification scenario after NZ loss: इंग्लंडने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या सुपर ८ मधील त्यांच्या शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडवर ४ विकेट्स राखून विजय मिळवला. इंग्लंडचा हा विजय पाकिस्तानला एक जीवदान देणारा ठरला आहे, कारण आज न्य़ूझीलंडने बाजी मारली असती तर ते उपांत्य फेरीत पोहोचले असते. मात्र, आता पाकिस्तानलाही ३ गुणांची कमाई करून न्यूझीलंडला कडवी टक्कर देत उपांत्य फेरीत पोहोचता येणार आहे. पाकिस्तानचा शेवटचा साखळी सामना श्रीलंकेविरुद्ध शनिवारी पल्लेकल येथे होणार आहे. पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहोचण्याचं स्वप्न जरी पडत असले तरी त्यासाठीचं गणित त्यांची झोप उडवणारं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com