

Rohit Sharma - Virat Kohli
Sakal
December 22 BCCI meeting decisions explained: विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी त्यांच्या निवृत्तीच्या चर्चांना आपल्या कामगिरीतून उत्तर दिले. मागील दोन वन डे मालिका या दोघांनी गाजवल्या आहेत आणि २०२७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेचे स्वप्न जीवंत ठेवले आहे. पण, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI ) अजूनही वेगळा विचार करतेय आणि येत्या २२ डिसेंबरला विराट-रोहित यांच्याबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. BCCI ची त्या तारखेला वार्षिक सर्वसाधारण बैठक होणार आहे.