

Aakash Chopra's IPL 2026 Sacked Captains Prediction
Sakal
BCCI planning new IPL schedule from 2028: मार्च-एप्रिल-मे, म्हटलं की इंडियन प्रीमिअर लीग हे समीकरण ठरलेलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) त्यासाठी या कालावधीत आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करणे बंद केले आहे. पण, आता दोन वर्षानंतर आयपीएल सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत होताना दिसल्यास, आश्चर्य वाटायला नको. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI) सध्या त्यादृष्टीने विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी म्हटले की, भारतीय उन्हाळ्यातील तीव्र उष्णता आणि त्यामुळे येणारा थकवा यामुळे BCCIला इंडियन प्रीमियर लीग सध्याच्या मार्च-मे महिन्याऐवजी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आयोजित करण्याचा विचार करावा लागू शकतो.