Fact check viral video Temba Bavuma Virat Kohli captaincy joke
टेम्बा बवुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने १४ जून २०२५ ला जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२५ स्पर्धा जिंकून इतिहास रचला. गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजयाची नोंद करताना आफ्रिकेने २७ वर्षांचा आयसीसी स्पर्धा विजेतेपदाचा दुष्काळ संपवला. दक्षिण आफ्रिकेने १९९८ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावून पहिले आयसीसी स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. आफ्रिकेच्या संघाचे मायदेशात जल्लोषात स्वागतही झाले आणि सर्वांनी कौतुकही केले. आता टेम्बा बवुमाच्या एका व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. कारण, त्यात विराट कोहलीच्या नावाचा समावेश आहे आणि त्यामुळे या व्हिडीओ मागचं सत्य जाणून घेणं महत्त्वाचे आहे.